रत्नागिरी पोलीस स्मार्ट, नागरिकांसाठी 'प्रतिसाद' अॅप

पोलीस म्हटलं की सर्वसामान्यांच्या मनात एक वेगळीच प्रतिमा निर्माण होते. पण हिच प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न रत्नागिरी पोलीस करत आहेत. यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनीच पुढाकार घेत, अॅपची निर्मिती केलीय. 

Updated: Jan 19, 2016, 11:38 PM IST
रत्नागिरी पोलीस स्मार्ट, नागरिकांसाठी 'प्रतिसाद' अॅप title=

रत्नागिरी : पोलीस म्हटलं की सर्वसामान्यांच्या मनात एक वेगळीच प्रतिमा निर्माण होते. पण हिच प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न रत्नागिरी पोलीस करत आहेत. यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनीच पुढाकार घेत, अॅपची निर्मिती केलीय. 

रत्नागिरी पोलिसांनी सामान्यांच्या मदतीसाठी तयार केलेल्या खास अॅपचं नाव आहे 'प्रतिसाद'... या ऍपमुळे संकटात सापडलेल्या व्यक्तीपर्यंत अगदी काही वेळात पोलिस मदतीसाठी धावून जाऊ शकणार आहेत. गुगल प्ले स्टोअरमधून हे ऍप डाऊनलोड करता येइल.  

संकटात सापडलेल्या महिलेला विशेष करुन या अॅपचा मोलाचा उपयोग होणाराय. रत्नागिरी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री सुद्धा या अॅपमुळे चांगलेच प्रभावित झाले. 

लाँच झाल्यानंतर दोन दिवसांतच जवळपास २०० जणांनी 'प्रतिसाद' अॅप डाऊनलोड करुन घेतलंय. संकटात सापडलेल्या व्यक्तीला तात्काळ प्रतिसाद देणं, या प्रतिसाद अॅपमुळे आता रत्नागिरी पोलिसांना शक्य होणार आहे.