रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात साळिंदरची शिकार जीवावर बेतलीय. रत्नागिरीच्या फुणगूस खांबेवाडीमध्ये ही घटना घडलीय.
साळिंदराची शिकार करण्यासाठी खांबेवाडीतील तीन जण बुधवारी रात्री जंगलात गेले होते. हे तिघेही सकाळपर्यंत परत आले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी, काही गावकऱ्यांनी जंगलात शोध घेतला असता एका बिळाजवळ या तिघांच्या चप्पला सापडल्या.
गावकऱ्यांपैंकी एकानं आत शिरून पाहिलं तेव्हा तिघांचेही मृतदेह त्याच्या नजरेस पडले... त्यानंतर गावकऱ्यांनी हे मृतदेह बाहेर काढून या तिघांनाही हॉस्पीटलमध्ये हलवलं... पण, डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं. धक्कादायक म्हणजे, यात दहावीत शिकणाऱ्या एका मुलाचाही समावेश आहे.
साळिंदर तर हाती लागलं नाही पण, बिळात घुसलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.