खातेवाटपाआधीच रवींद्र चव्हाण झाले स्वयंघोषित गृहराज्यमंत्री

नवनियुक्त राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे वादाच्या भोव-यात सापडले आहेत.

Updated: Jul 9, 2016, 07:54 PM IST
खातेवाटपाआधीच रवींद्र चव्हाण झाले स्वयंघोषित गृहराज्यमंत्री title=

डोंबिवली : नवनियुक्त राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे वादाच्या भोव-यात सापडले आहेत. राज्य मंत्रिमंडळाचं नवं खातेवाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप जाहीर केलेलं नाही, पण त्याआधीच गृह आणि कारागृह खात्याचे राज्यमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांनी आपलं स्वतःचंच खातेवाटप जाहीर करून टाकलं आहे. 

तशा आशयाचे होर्डिंग्ज आणि बॅनर्स संपूर्ण कल्याण-डोंबिवली भागात ठिकठिकाणी लागले आहेत. पलावातील लोढा कॉम्प्लेक्सपासून मानपाडा रोडपर्यंत एकच मजकूर असलेले हे बॅनर्स लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. खातेवाटप होण्याआधीच रवींद्र चव्हाण यांनी गृह खातं स्वतःलाच जाहीर केल्यानं, ते मुख्यमंत्री आहेत का, असा सवाल आता केला जात आहे. 

कृष्णराव धुळप यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं, त्याच मतदारसंघातले रवींद्र चव्हाण अशाप्रकारं पोस्टरबाजीर करत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.