ठाणे: जगात दुर्मिळ होत जात असलेल्या आदिमानवसदृश ‘स्लेडर लॉरीस’ प्रजातीच्या चार माकडांची सुटका ठाणे पोलिसांनी केली आहे. ही चार माकडं ठाण्यात विक्रीसाठी आणली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तामिळनाडूच्या जंगलात आढळणाऱ्या या प्राण्याला आदिवासी समाज देव मानतो. तर या प्राण्याचे संपूर्ण शरीर औषधी असल्याचा समज असून याचा वापर काळ्या जादूतही केला जात असल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे पाच कोटी असल्याचा दावा ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकानं पत्रकार परिषदेत केला.
ठाण्यातील मानपाडा पेट्रोल पंप ते घोडबंदर सर्व्हिस रोडदरम्यान काहीजण ‘स्लेडर लॉरीस’ ही माकडे विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी लावलेल्या सापळ्यात वॅगनआर मोटारीतून आलेल्या विजू चाको (३५), नागराज गुज्जा (५३), राजेंद्र विधाते (३९) आणि विनोद सुतार (३१) ही चौकडी अडकली. त्यांच्याकडून आदिमानवासदृश दुर्मिळ प्रजातीची स्लेडर लॉरीस ही माकडे हस्तगत करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.