ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त आणि सुरक्षा रक्षकांनी फेरीवाला कारवाई दरम्यान रिक्षा चालक आणि फेरीवाल्यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मध्यरात्रीपासून ठाण्यातील रिक्षा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण संपकरी संघटानामध्ये फूट पडल्याचं चित्र आहे.
शिवसेना आणि भाजपच्या रिक्षा संघटनांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सेना, भाजपच्या रिक्षा संघटनांचे रिक्षाचालक सकाळपासून रस्त्यावर आहेत.
सकाळी १० वाजता गावदेवी येथुन सर्व रिक्षाचालक आणि फेरीवाले जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्च्या काढणार आहेत. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल आणि त्यानंतर रिक्षा चालु करण्यात येतील.
11 रिक्षा संघटना आणि 4 फेरीवाले संघटना बंद आणि मोर्च्या मध्ये सहभागी होणार होत्यात. पण आता सेना, भाजपच्या संघटनांनी संपातून माघार घेतलीय, असं असलं, तरी लांबून ठाणे स्टेशनला येताना अनेक प्रवाशांचे हाल होतायत.