ठाणे : उल्हासनगरमधील वडापाव दुकानमालक चंदरलाल रामरखियानी यांचा मृत्य, शंभर टक्के भाजलेले चंदरलाल रामरखियानी याचा उपचारादरम्यान झाला मृत्यू
उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात समोरासमोर वडापावविक्रीचे स्टॉल लावण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दुकानदार चंदरलाल रामरखियानी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्यात झाले. रामरखियानी हा 100 टक्के भाजला होता. त्याला नवी मुंबई येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. रामरखियानी यांना जाळण्याचा प्रयत्न करणारा सुरेश आहुजा हा फरार आहे.
उल्हासनगर कॅम्प नं. ४, रेल्वे स्टेशनबाहेर रामरखियानी यांने दुकान भाड्याने घेऊन वडापाव सेंटर सुरू केले. यापूर्वी सुरेश आहुजा याने हे दुकान भाड्याने घेऊन वडापावचा धंदा केला होता. महालक्ष्मी सेंटरसमोर आहुजा याचे नवीन वडापाव दुकान मंगळवारपासून सुरू होण्याची कुणकुण रामरखियानी याला लागली होती. याबाबत, आक्षेप घेतल्याने सुरेश आणि रामरखियानी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या रागातून सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आहुजाने बाटलीतून आणलेले पेट्रोल रा रामरखियानी यांच्या अंगावर टाकून त्यांना पेटवून दिले.