'सैराट' फेम आर्चीला पाहण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी, २.५० लाखांची चोरी

बातमी झिंगाट चोरट्यांची. विटा इथं अभिनेत्री रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि पोलिसांचा बंदोबस्त असूनही अडीच लाखांची बॅग लंपास केली. 

Updated: Aug 11, 2016, 06:17 PM IST
'सैराट' फेम आर्चीला पाहण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी, २.५० लाखांची चोरी

सांगली : बातमी झिंगाट चोरट्यांची. विटा इथं अभिनेत्री रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि पोलिसांचा बंदोबस्त असूनही अडीच लाखांची बॅग लंपास केली. 

ही रक्कम मानसिंग बँकेची होती. आयसीआयसीआय बँकेत ही रक्कम जमा करण्यासाठी मानसिंग बँकेचा कर्मचारी आला होता. मात्र गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला.

‘सैराट’ फेम ‘आर्ची’ला पाहण्यासाठी आजही हजारो लोक रस्त्यावर उतरतात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा विट्यामध्ये आला. पण यावेळी ‘आर्ची’च्या नादात एका व्यक्तीला अडीच लाखांची रोकडही गमवावी लागली. अगदी पोलीस ठाण्याच्या जवळूनच त्याची अडीच लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी लांबविली.

विट्यातील एका दुकानाच्या उदघाटनासाठी रिंकू राजगुरू आली होती.  ती येणार असल्याची बातमी पसरल्यामुळे विट्यासह आजूबाजूच्या गावातील तरुणांनी गर्दी केली होती. हजारो लोक आर्चीला पाहण्यासाठी आले होते. 

रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी तुफान गर्दी झाल्याने गुहागर विजापूर या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. पोलिसांनी तरुणाईला आवरण्यासाठी सौम्य लाठीमार केल्याचे वृत्त आहे.