'महाराजांचं स्मारक समुद्रात उभारू नका' - संभाजी भिडे

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रात उभारू नका, तर ते प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्यात यावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे जाहीर कार्यक्रमात केली आहे.  

Updated: Jan 27, 2016, 03:09 PM IST
'महाराजांचं स्मारक समुद्रात उभारू नका' - संभाजी भिडे title=

कोल्हापूर : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रात उभारू नका, तर ते प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्यात यावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे जाहीर कार्यक्रमात केली आहे.  

समुद्र आणि शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही, ज्या जागी आपण स्मारक उभारत आहात, त्या ठिकाणी समुद्राच्या ४ किलोमीटर आत महाराजांचा कधी पदस्पर्शही झाला नसेल, तेथे समुद्रात त्यांचं स्मारक कशासाठी बांधायचं?, असा प्रश्न ही संभाजी भिडे यांनी केला.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीमध्ये धारातीर्थ मोहीम राबवण्यात आली आहे. ह्या मोहीमेच्या सांगता समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दोन वेगवेगळ्या दिवशी साजरी करणं थांववा, तसेच १९ फेब्रुवारीच्या आधी महाराजांच्या जयंतीची तिथी जाहीर करा, तुमच्याकडे सत्ता आहे, कुणाच्या तोंडाकडे पाहण्याची गरज नाही, अशी सूचना आज शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली.