'सनातन'च्या तावडीतून तरुण आपल्या मुलीला सोडवण्यासाठी झगडतोय बाप!

आपल्या तरुण मुलीचं ब्रेन वॉश करत तिला 'सनातन' या संस्थेनं आपल्या आश्रमात गुंतवून ठेवल्याचा आरोप एका वडिलांनी केलाय. विशेष म्हणजे, अशाप्रकारे तरुण-तरुणींना धर्माच्या नावाने आपल्या जाळ्यात ओढून गैरमार्गाला लावणाऱ्या 'सनातन'सारख्या संस्थांवर कारवाई करावी, अशी जनहित याचिकादेखील त्यांनी दाखल केलीय. 

Updated: Oct 1, 2015, 12:51 PM IST
'सनातन'च्या तावडीतून तरुण आपल्या मुलीला सोडवण्यासाठी झगडतोय बाप! title=

महेश पोतदार, उस्मानाबाद : आपल्या तरुण मुलीचं ब्रेन वॉश करत तिला 'सनातन' या संस्थेनं आपल्या आश्रमात गुंतवून ठेवल्याचा आरोप एका वडिलांनी केलाय. विशेष म्हणजे, अशाप्रकारे तरुण-तरुणींना धर्माच्या नावाने आपल्या जाळ्यात ओढून गैरमार्गाला लावणाऱ्या 'सनातन'सारख्या संस्थांवर कारवाई करावी, अशी जनहित याचिकादेखील त्यांनी दाखल केलीय. 

तुळजापूर तालुक्यातील अणदूरचे रहिवासी आणि पत्रकार राजेंद्र स्वामी यांना आपल्या मुलीची 'सनातन'च्या ताब्यातून सोडवणूक करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागलीय. 

अधिक वाचा - पानसरे हत्या : समीर गायकवाडच्या कोठडीत वाढ तर श्रद्धा पवारची चौकशी

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक असलेल्या समीर गायकवाडला अटक झाली. त्यानंतर सनातन संस्था आणि त्यात काम करणारे साधक संशयाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. त्यामुळे सनातनच्या हजारो साधकांचे कुटुंबीय धास्तावले आहेत. राजेंद्र स्वामीही त्यापैंकीच एक...

स्वामी आपल्या तीन मुली आणि दोन मुलांसह राहत होते. मोठी मुलगी इंजिनिअर, दुसर्‍या मुलीचे पॉलिटेक्निक झालेले, एक मुलगा एमएस्सी, दुसरा मुलगा बारावीत आहे... अशा उच्चशिक्षित कुटुंबात वाढलेली स्वामी यांची एम. कॉमच्या पहिल्या वर्षाला असलेली प्रियंका स्वामी ही मुलगी सनातनच्या संपर्कात आली आणि काही दिवसानंतर कुणालाही काहीही न कळवता ती 3 जुलै 2009 रोजी घरातून अचानक गायब झाली. 

अधिक वाचा - मानवी बाँबच्या आरोपावरून सनातनचा श्याम मानवांवर घणाघाती आरोप

आपली मुलगी 'सनातन'च्या आश्रमात असल्याचं राजेंद्र स्वामी यांना समजलं. पण, घरी परतायला तयार नसलेल्या प्रियांकाला परत घरी आणण्यासाठी स्वामी यांनी कायदेशीर लढा सुरु केला. गेल्या सहा वर्षापासून हा लढा सुरुच आहे. मुलीला सनातनच्या कचाट्यातून सोडविण्यासाठी राजेन्द्र स्वामी यांनी राज्यातील अनेक नेत्यांपुढे हातही पसरले... मात्र, त्याचा उपयोग काही झाला नाही. 

अधिक वाचा - श्याम मानव यांना सनातनचे आव्हान, तुम्ही हे करु दाखवाच!
 
मुलीच्या शोधात राजेंद्र स्वामी यांनी सनातनच्या राज्यातील अनेक आश्रमात हेलपाटे मारले आहेत. पण सनातनच्या  प्रभावाखाली असलेल्या प्रियंकानं आपल्या वडिलांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.

सनातन संस्था देशातील तरूण मुला-मुलींना कशा पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढते? याची तपासणी करण्यासाठी संस्थेच्या आश्रमावर पोलिसांनी छापे टाकावेत, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत करण्यात आलीय. 

'सनातन'चा प्रचार करणाऱ्या प्रियांका स्वामी हिचा हा व्हिडिओ

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.