सावधान! ताकारी गावाचं होऊ शकतं दुसरं माळीण!

सांगली जिल्ह्यातील सागरेश्‍वर डोंगरकडांना भेगा पडल्यात. इथले मोठ-मोठे पाषाण कोसळण्याच्या स्थितीत आहेत.. त्यामुळं डोंगराच्या पायथ्याशी असलेलं ताकारी गावाच्या पंचक्रोशीवर माळीणसारख्या दुर्घटनेची टांगती तलवार लटकतेय. 

Updated: Aug 11, 2014, 03:10 PM IST
सावधान! ताकारी गावाचं होऊ शकतं दुसरं माळीण! title=

सांगली: सांगली जिल्ह्यातील सागरेश्‍वर डोंगरकडांना भेगा पडल्यात. इथले मोठ-मोठे पाषाण कोसळण्याच्या स्थितीत आहेत.. त्यामुळं डोंगराच्या पायथ्याशी असलेलं ताकारी गावाच्या पंचक्रोशीवर माळीणसारख्या दुर्घटनेची टांगती तलवार लटकतेय. 

सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव, वाळवा, पलूस, खानापूर तालुक्यांच्या सीमा जोडणार्‍या सह्याद्री पर्वत माथ्यावरील हे ठिकाण म्हणजे सागरेश्वर… या डोंगरावर साकारलंय मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्य... विविध वृक्ष, वनराईनं नटलेला हा परिसर पर्यटकांचं आकर्षण. सागरेश्वर डोंगरावर मध्यभागी कमळ भैरवाचं मंदीर आहे. हे मंदिर प्राचीन असून ते ताकारी गावचे ग्रामदैवत आहे. डोंगराच्या पायथ्याला ताकारी गाव आहे.

मात्र आता इथं पंधरा ते वीस फुटाचे पाषाण पडण्याच्या परिस्थितीत आहेत. सागरेश्वर डोंगराला भेगा पडलेल्या आहेत. याच डोंगराच्या कडा आणि पाषाण पडल्यास ताकारी गावातील घरासह आणि इथल्या कमळ भैरव मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो.

ताकारी गाव आणि कमळ भैरव मंदिराला असलेल्या या संभाव्य धोक्याबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार दाखल केलीय.. याबाबत वीस लाखांचा निधीही मंजूर आहे. मात्र वनविभाग काम करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत.

या संदर्भात निधी मंजूर झाला असला तरी बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार होऊन आलं नाही असं सरकारी उत्तर सागरेश्वर अभयारण्याचे वनाधिकारी देतायत. मात्र हाच पाषाण किंवा डोंगरकडा कोसळून माळीणसारखी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल ताकारीचे ग्रामस्थ विचारतायत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.