दाभोलकरांवर सारंग आकोलकरचनंच झाडल्या गोळ्या, तपासात उघड

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या डॉक्टर वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर सीबीआयच्या हाती खूप मोठी माहिती लागलीय.

Updated: Jun 14, 2016, 03:17 PM IST
दाभोलकरांवर सारंग आकोलकरचनंच झाडल्या गोळ्या, तपासात उघड title=

पुणे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या डॉक्टर वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर सीबीआयच्या हाती खूप मोठी माहिती लागलीय.

गोवा स्फोटातल्या आरोपींनीच डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केल्याचं पुढे आलंय. वीरेंद्र तावडेच्या चौकशीतून समोर आलेल्या धक्कादायक माहितीत तावडे आणि सारंग आकोलकर या दोघांनी मिळून दाभोलकरांच्या हत्येचा कट रचल्याचं स्पष्ट झालंय. 

दाभोलकरांवर गोळ्याही सारंग आकोलकरनं झाडल्या. त्यासाठी स्थानिकांच्या मदतीन त्यानं दाभोलकार जिथे जिथे फिरतात त्या जागांची रेकीही केली होती. 

महत्त्वाचे म्हणजे दाभोळकर यांची हत्या करण्यासाठी जे पिस्तुल वापरण्यात आलं ते देखील सारंग आकोलकरनेच आणलं होतं. 

याकरता सारंग आकोलकर ई-मेलद्वारे वीरेंद्र तावडेशी संपर्कात होता. हत्येकरता काय काय पाहिजे? हत्या कशी करायची? याबाबतही सारंग आकोलकरने वीरेंद्र तावडेशी मेलद्वारे चर्चा केली, अशी माहिती सीबीआय सूत्रांनी दिलीय. त्यामुळे नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणाचा गुंता लवकरच उलगडण्याची चिन्हं आहेत.