10 रुपयात मिळणारी भाजी करेल कोलेस्ट्रॉलचा नायनाट, दिवसातून 2 वेळा असं करा सेवन

Bad Cholesterol Home Remedies : शरीरात घाणेरडा कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदय विकाराचा धोका निर्माण होतो. अशावेळी स्वयंपाक घरातील एक भाजी हा कोलेस्ट्रॉल मुळापासून खेचून काढेल. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 1, 2024, 05:03 PM IST
10 रुपयात मिळणारी भाजी करेल कोलेस्ट्रॉलचा नायनाट, दिवसातून 2 वेळा असं करा सेवन  title=

उन्हाळ्यात खाल्ली जाणारी भाजी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण भाज्यांबाबत उन्हाळ्यामुळे सर्वाधिक गोंधळ असतो. कोणती भाजी आरोग्यासाठी चांगली हे कळत नाही. कारण उकाडा इतका वाढलेला असतो की, या दिवसांमध्ये आहारही पोटभर जात नाही. अशावेळी अतिशय स्वस्त दरात मिळणारी दुधीची भाजी खावी. कारण या भाजीच्या सेवनाने शरीरातील गंभीर आजारही दूर होतात. त्यामुळे घाणेरडा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दुधी अतिशय फायदेशीर ठरतो. या लेखात आपण कोलेस्ट्रॉलकरिता कसे फायदेशीर असते हे समजून घेऊया. 

दुधी फायदेशीर

कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी दुधीचा तुकडा हा एक चांगला पर्याय मानला जातो. त्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण खूपच कमी असून यामध्ये भरपूर पाणी आहे. यासोबतच हा आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहे. यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. एवढेच नाही तर कोलेस्ट्रॉलमुळे वाढते वजन कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो. त्यामुळे दुधीची भाजी तुमच्यासाठी सर्वोत्तम भाजी असू शकते.

दुधीचे सेवन कसे करावे?

रायता 
ते तयार करण्यासाठी प्रथम दुधी किसून मोकळी करावी. यानंतर त्यात 1 वाटी दही, थोडं काळे मीठ, जिरेपूड घालून मिक्स करा. उन्हाळ्यात तुम्ही ते दुपारच्या जेवणात खाऊ शकता.

ज्यूस
रिकाम्या पोटी सकाळी दुधीचा ज्यूस प्यायलास सर्वाधिक फायदा होतो. यामुळे रिकाम्या पोटी ताजा दुधी किसून मिक्सरमधून फिरवून घ्या. आणि हा ज्यूस ताजाच प्यावा. तसेच दुधीचा ज्यूस करण्यापूर्वी तो चाखून पाहावा. 

दुधीचे आरोग्यदायी फायदे 

पाण्याचे भरपूर प्रमाण
दुधीमध्ये भरपूर पाणी असते जे आपल्याला सतत हायड्रेटेड राहण्यास मदत करते. चांगल्या प्रमाणात पाणी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते. 

भरपूर फायबर
दुधीमध्ये सेवन केल्याने आपल्याला पुरेशा प्रमाणात फायबर मिळते. त्यामुळे आपले पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळेच आपण जास्त खाणे टाळतो आणि आपले वजनही झपाट्याने कमी होते.

चरबी कमी होते
तुम्ही दुधीचे सेवन अनेक प्रकारे करू शकता परंतु दुधीचा रस चरबी जाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय मानला जातो. यासाठी दुधी सोलून घ्यावी. आता त्याचा रस काढा. हा काढलेला रस हलके काळे मीठ आणि लिंबू मिसळून प्या.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)