सातारा-करमाळा एसटी अपघातात ८ ठार १२ जखमी

सातारा - करमाळा एसटीला भिषण अपघात झाला. या अपघातात ८ ठार तर १२ प्रवासी जखमी झालेत. एसटी अकलुजजवळ झाडावर आदळून हा अपघात झाला. हा अपघात सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या दरम्यान झाला. जखमीना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Updated: Jul 28, 2016, 11:53 PM IST
सातारा-करमाळा एसटी अपघातात ८ ठार १२ जखमी title=

अकलूज : सातारा - करमाळा एसटीला भिषण अपघात झाला. या अपघातात ८ ठार तर १२ प्रवासी जखमी झालेत. एसटी अकलुजजवळ झाडावर आदळून हा अपघात झाला. हा अपघात सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या दरम्यान झाला. जखमीना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

एसटी साताऱ्याहून करमाळ्याकडे जात होती. अकलूज येथे आली असता एसटी चालकाने एका वळणावर एका दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र एसटी बस झाडाला जाऊन धडकली आणि मोठी दुर्घटना घडली. 

गाडीतील जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर अपघाताच्या वेळी ५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.  दरम्यान, मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.