अहमदनगर : भगवानगड वादाच्या पार्श्वभूमीवर गडावर अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
एक पोलीस अधीक्षकसह 3 पोलीस उपअधीक्षक, 11 पोलीस निरीक्षक, 21 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 325 पोलीस कर्मचारी, 75 महिला पोलीस कर्मचारी, 2 आरसीपी प्लातून, 2 राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात.
याशिवाय बाहेरच्या जिल्ह्यातून 2 पोलीस उपअधीक्षक, 10 पोलीस निरीक्षक, 15 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 250 पोलीस कर्मचारी, 50 महिला पोलीस आणि होमगार्ड अशी अतिरिक्त कुमकही तैनात करण्यात आलीय.
वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी भगवानगड येथे भेट देऊन पाहणी देखील केली.