पोलिसांची गुंडागर्दी? शिक्षकाला भरचौकात केली हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

पोलिसांच्या गुंडगर्दीचा पुन्हा एकदा प्रत्यय शिर्डीत समोर आला आहे. एक वाहतूक पोलिस दुचाकीस्वाराला मारत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

Updated: Oct 5, 2015, 07:46 PM IST

शिर्डी : पोलिसांच्या गुंडगर्दीचा पुन्हा एकदा प्रत्यय शिर्डीत समोर आला आहे. एक वाहतूक पोलिस दुचाकीस्वाराला मारत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

शिर्डी नगरपंचायतीजवळ पिंपळवाडी रोडवर हा प्रकार गेल्या दोन दिवसांपूर्वी घडला आहे. मारहाण झालेली व्यक्ती प्राथमिक शिक्षक आहे. बॅरिकेट तोडून हा शिक्षक जात होता, त्यावेळी पोलिसांनी त्याला हटकले. पोलिस आणि शिक्षक यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यातून ही हाणामारी झाली. 

शिक्षकाने माफीनामा देऊन प्रकरण मिटवलं होतं पण मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. आता वाहतूक पोलिसावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. दरम्यान घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सांगितले आहे. 

हा व्हिडिओ एकतर्फी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.