शिवसेनेचे पुणे मिशन, महापालिकेत काय केलं पाहा

काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच भाजपलाही पुणे महापालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्याचं आवाहन शिवसेननं केलंय. 

Updated: Oct 25, 2016, 06:07 PM IST
शिवसेनेचे पुणे मिशन, महापालिकेत काय केलं पाहा title=

पुणे : काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच भाजपलाही पुणे महापालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्याचं आवाहन शिवसेननं केलंय. 

शिवसेनेनं पुणे महापालिकेवर परिवर्तन मोर्चा काढला. त्यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी भाजपवर निशाणा साधला. आगामी महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून महापालिकेवर शिवसेनेचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास निम्हण यांनी यावेळी व्यक्त केला.

मागील 25 वर्षापासून महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. पुणेकरांना प्रत्येकवेळी आश्वासनं देण्याचं काम सत्ताधा-यांनी केल्याची टीका काँग्रेस-राष्ट्रवादीवर करतानाच भाजपरवरही हल्ला चढवला.