कल्याणमध्ये शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

 कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रणसंग्रामात आता चांगलाच रंग भरु लागलाय. भाजपने शिवसेनेला हादरा देण्यासाठी व्युहरचना केलेय. त्याचाच एकभाग म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्याचा चंग  बांधण्यात आलाय. आता फोडाफोडीचे राजकारण रंगणार आहे.

Updated: Oct 17, 2015, 01:33 PM IST
कल्याणमध्ये शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश title=

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रणसंग्रामात आता चांगलाच रंग भरु लागलाय. भाजपने शिवसेनेला हादरा देण्यासाठी व्युहरचना केलेय. त्याचाच एकभाग म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्याचा चंग  बांधण्यात आलाय. आता फोडाफोडीचे राजकारण रंगणार आहे.

महानगर पालिकेत शिवसेना-भाजप युती अधिकृतरित्या तुटल्यानंतर आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आलाय. संघटनात्मक ताकदीच्या जोरावर राजकारण करणा-या शिवसेनेला डोंबिवलीत खिंडार पाडण्यात भाजप आमदार रवींद्र चव्हाण यशस्वी झालेत.

शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज झालेल्या सुमारे शंभर शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. आगामी काळात दोन्ही पक्षांकडून फोडाफोडीचे हे राजकारण वाढण्याची चिन्हं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.