युतीत वितुष्ट: सेना-भाजप दोघांकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल

औरंगाबादच्या महापौर पदावरून युती पुन्हा विभक्त होणार असं चित्र निर्माण झालंय. शिवसेना आणि भाजपकडून महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं आता महापौर कुणाचा हाच औरंगाबादच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरतोय.

Updated: Apr 26, 2015, 12:54 PM IST
युतीत वितुष्ट: सेना-भाजप दोघांकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल title=

औरंगाबाद: औरंगाबादच्या महापौर पदावरून युती पुन्हा विभक्त होणार असं चित्र निर्माण झालंय. शिवसेना आणि भाजपकडून महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं आता महापौर कुणाचा हाच औरंगाबादच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरतोय.

अडीच अडीच वर्ष महापौरपद विभागून घेण्याचा प्रस्ताव भाजपनं सेने पुढे ठेवला होता. मात्र शिवसेनेनं हा प्रस्ताव नाकारला आणि ४ वर्ष शिवसेना तर अखेरचं एक वर्ष भाजपला महापौरपद असा प्रस्ताव ठेवला. मात्र भाजपनं हा प्रस्ताव धुडकावला, अखेर शिवसेनेकडून त्र्यंबक तुपे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला.

बैठका करुनही तिढा न सुटल्यानं भाजपनं सुद्दा महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरले.  राजू शिंदे यांनी महापौर पदाची तर प्रमोद राठोड यांना उपमहापौर पदाची उमेदवारी देण्यात आली.  त्यामुळं या सगळ्या गदारोळात महापौर आणि उपमहापौरपदची निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची होईल यात शंका नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.