शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांना सक्तमजुरीची शिक्षा

शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांना औरंगाबाद सत्र न्यायालयानं एक वर्षाची सक्तमजूरी आणि 5 हजाराचा दंड ठोठावला आहे, 

Updated: Jan 6, 2017, 03:09 PM IST
शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांना सक्तमजुरीची शिक्षा title=

औरंगाबाद : शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांना औरंगाबाद सत्र न्यायालयानं एक वर्षाची सक्तमजूरी आणि 5 हजाराचा दंड ठोठावला आहे, 

2012 मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण औररंगाबाद दौ-यावर असतांना त्यांच्या ताफ्यात घुसखोरी करणे, शासकीय कामात अडथळा आणणे आणि पोलिसांना मारहाण कऱण्याचा गुन्हा त्यांच्यावर सिद्ध झाला आहे. 

पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी याबाबत तक्रार केली होती. कोकणे आणि दोन महिला पोलिसांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. गुन्ह्याची शिक्षा तीन दिवसांच्या आतली असल्यानं त्यांना तीस दिवसांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर या शिक्षेला हायकोर्टात आव्हान देण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आलीय.