औरंगाबाद : छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलेल्या श्रुती कुलकर्णी हिच्या आत्महत्या प्रकरणातील आरोप स्वप्निल मणियार याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.
श्रुतीच्या हत्येनंतर स्वप्निलनं पोबारा केला होता. त्याला आज अहमदनगरमधील नेवासा इथून पोलिसांनी अटक केलीय. श्रुतीच्या आत्महत्येनंतर तिसऱ्या दिवशी ही अटक झालीय.
अधिक वाचा - 'बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता'
दरम्यान, या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिलीय.
अधिक वाचा - मुख्यमंत्री महोदय, श्रुती वाचली असती हो....
नीलम गोऱ्हे यांनी औरंगाबादमध्ये जाऊन श्रुतीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचीही भेट घेऊन या प्रकरणाबाबत चौकशी केली. यावेळी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नीलम गोऱ्हे यांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली.
अधिक वाचा - श्रुती आत्महत्या प्रकरण : पीएसआय खटावकर निलंबित
श्रुती आत्महत्येप्रकरणी संबंधीत अधिकारी हरीश खटावकर यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध महिला संघटनांनी केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.