MIDCतील या प्लॉटवरुन भाजप-शिवसेनेत कलिगीतूरा

पालघरमधील बोईसर MIDCतील प्लॉट नंबर ओएस 46/2 वरुन भाजप आणि शिवसेसेनेत चांगलाच सामना रंगलाय.

Updated: Aug 22, 2015, 04:34 PM IST
MIDCतील या प्लॉटवरुन भाजप-शिवसेनेत कलिगीतूरा title=

पालघर : पालघरमधील बोईसर MIDCतील प्लॉट नंबर ओएस 46/2 वरुन भाजप आणि शिवसेसेनेत चांगलाच सामना रंगलाय.

शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रामदेव सिद्धेकर कंपनीला सदर प्लॉट विकल्यानंतर हा प्लाँट रहीवाशांसाठी खुला राहावा, या मागणीसाठी मैदान बचाव संघर्ष समीतीनं कंबर कसली असून भाजपनं त्यांना पाठींबा दर्शवलाय. 

भाजपचे पालघरचे खासदार चिंतामण वणगा , आदिवासी विकासमंत्री आणि जिल्हाचे पालकमंत्री विष्णु सावरा यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलंय. 

दरम्यान, शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यांनी विकलेलल्या प्लाँटचं भाजपचे मंत्री चांगलचं राजकरण करून सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्व करताना दिसतायत. शिवाय या सर्व प्रकरणातून सेना आणि भाजप यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.