रायगड : जिल्हयात मुरूड-जंजिराच्या समुद्रात आज दुपारी सहा जणांचा बुडून मृत्यू झालाय. मुंबईत चेंबूरचे पंधरा जण आज सकाळी एक गाडी घेऊन मुरूडला पयर्टनासाठी गेले होते.
दुपारच्या वेळेस हे सारे पयर्टक पोहण्यासाठी समुद्रात उतरले असता त्यातील सहा जण समुद्रात ओढले गेले आणि त्यातच बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मुरूड पोलिसांनी दिली.
या सर्वांचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. रायगड जिल्हयात अलिबाग वगळता अन्यत्र कुठेही अपघात रोखणारी यंत्रणा अस्तित्वात नाही.
स्थानिकांनी वारंवार विनंती करूनही पयर्टकांना समु्द्रात उतरण्याचा मोह आवरता येत नाही आणि त्यातूनच वारंवार अशा घटना घडत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.