मराठमोळ्या तरुणानं तयार केला हानी न पोहचवणारा 'स्मार्ट चार्जर'

मोबाईल चार्जिगला लावून बोलताना स्फोट झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. अशा घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमावावा लागलाय.. मोबाइल बॅटरीच्या अशा घटनांना रोखण्याच्या विचारातून पुण्यातल्या एका तरुणानं एक 'स्मार्ट चार्जर' तयार केलाय.

Updated: Oct 31, 2015, 10:40 PM IST
मराठमोळ्या तरुणानं तयार केला हानी न पोहचवणारा 'स्मार्ट चार्जर' title=
प्रातिनिधिक फोटो

कैलास पुरी, पिंपरी - चिंचवड : मोबाईल चार्जिगला लावून बोलताना स्फोट झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. अशा घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमावावा लागलाय.. मोबाइल बॅटरीच्या अशा घटनांना रोखण्याच्या विचारातून पुण्यातल्या एका तरुणानं एक 'स्मार्ट चार्जर' तयार केलाय.

पिंपरी चिंचवडमधल्या क्षितीज भैरवकर या तरुणानं हा 'स्मार्ट चार्जर' तयार केलाय. ताथवडे मधल्या राजर्षी शाहू महाविद्यालयात तो इंजिनियरींग शिकतो. क्षितीजन तब्बल दीड महिने संशोधन करुन 'स्मार्ट चार्जर'ची निर्मिती केलीय. 

क्षितीजनं तयार केलेल्या चार्जरची खासीयत म्हणजे मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर त्यादरम्यान कॉल आल्यास त्याचा पॉवर सप्लाय बंद होतो. कॉल संपल्यावर पुन्हा ऑटोमॅटीक चार्जिंग सुरु होतं तसचं बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतरही पॉवर सप्लाय बंद होतो त्यामुळे बॅटरी फुटण्याचा धोकाही टाळता येतो.

क्षितीजच्या या संशोधनाला इंडियन पेटंट अॅक्टनुसार पेटंटही मिळालय. पुस्तकी ज्ञान न घेता शिक्षणाचा असा उपयोग करण खरंच कौतुकास्पद आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.