राजा निघाला राणीच्या देशात?

फळांचा राजा हापूसची... हापूसच्या आयातीवर युरोपीय युनियननं घातलेली बंदी आता उठण्याची शक्यता निर्माण झालीय...

Updated: Dec 4, 2014, 08:26 PM IST
राजा निघाला राणीच्या देशात?

रत्नागिरी : फळांचा राजा हापूसची... हापूसच्या आयातीवर युरोपीय युनियननं घातलेली बंदी आता उठण्याची शक्यता निर्माण झालीय...

फळांचा राजा हापूस... या आंब्याची चव चाखली नाही असा माणूस क्वचितच असेल... पण यंदा ही चव चाखण्यासाठी साधारणपणे मार्च महिन्याची वाट पहावी लागणार आहे. कारण यंदा आंब्यासाठी लागणारी थंडी हवी तशी पडलेली नाही. त्यामुळेच आंब्याचं आगमन लांबणार आहे. अवकाळी पावसामुळे आलेल्या पालवीमुळेही आंब्याचा सीजन लांबणार असल्याचं उपविभागीय कृषि अधिकारी आरीफ शाह यांनी म्हटलंय. 

आंब्याचं आगमन लांबणार असलं तरी यंदा युरोपाची दारं खुली होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी फळमाशीचं कारण देत आरोग्याला धोका निर्माण होईल म्हणून युरोपात आंब्याला बंदी घालण्यात आली होती. मात्र, युरोपीय देशाचं पथक नुकतंच भारतात येऊन गेलं. त्यांनी भारतातील हापूस निर्यात केंद्राची कामगिरी समाधानकारक असल्याचं मत नोंदवलंय. युरोपवारीच्या शक्यतेच्या बातमीनं कोकणातल्या आंबा निर्यातदारांच्या आशा पल्लवीत झाल्यात.   
 
कोकणचा राजा हा निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. पण गेल्या वर्षी चुकीच्या नियोजनामुळे माशी शिंकली... आणि आता त्याचा आंबा बागायतदारांना बसला... पण यंदा युरोपचं पथक अनुकूल असल्यामुळे परदेश वारीसाठी आंब्याचं पान ठेवायला काही हरकत नाही... 
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.