मुंबई : गणपतीसाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांवर मध्य रेल्वे प्रसन्न झालीय.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासियांसाठी रेल्वेने 90 विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केलीय.
26 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळात या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
मुंबई-मडगाव, मुंबई-रत्नागिरी आणि मुंबई-कोल्हापूर दरम्यान या खास गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिलीय.
कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून या विशेष गाड्या धावणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.