महाड : महाडजवळ सावित्री नदीवरील पूल वाहून गेला, त्या अपघातात दोन एसटी बस बेपत्ता आहे. त्यापैकी राजापूर-बोरिवली बसचे वाहक प्रभाकर भानुराव शिर्के यांची माहिती मिळाल्यावर अनेकांच्या मनात धस्स झाले.
शिर्के राजवाडी, संगमेश्वरचे रहिवासी आहेत. त्यांच्या जीवनात दोन महिन्याने आरामाचा आणि सुखाचा क्षण येणार होता.
शिर्के यांनी गेली अनेक वर्ष एसटीमध्ये सेवा केली. आता दोन महिन्यांनंतर ते सेवा निवृत्त होणार होते. पण अचानक ही दुर्घटना घडली. दुर्घटनाग्रस्त बसमध्ये ते इतर प्रवाशांसह प्रवास करत होते.
ही बातमी कळताच अनेकांच्या काळजात धस्स झाले. आता शिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शोधण्यासाठी एडीआरएफच्या टीम व्यस्त आहेत. एसटी समुद्रात वाहून गेल्या असतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, एनडीआरएफने एसटी किंवा इतर गाड्यांच्या शोधासाठी ३०० किलोचं चुंबक आणलं आहे. ते चुंबक हेलिकॉप्टरच्या साहाय्याने ते चुंबक उफाळलेल्या सावित्री नदीत सोडण्यात येत आहेत. त्यांच्या साहय्याने गाड्यांचा तपास घेतला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.