जळगाव: टिव्ही बघताना वडील रागावल्यानं बहिणाबाई कॉलनी भागातील एका अल्पवयीन मुलीनं आज संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. चार दिवसातील ही चौथी घटना आहे.
आसोदा रस्ता भागात मजूर कुटुंबातील मुलगी टिव्ही पाहात बसली होती. वडील रागावल्यानं दोघांमध्ये वाद झाला. संतप्त मुलीनं मागच्या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार काही वेळानंतर लक्षात आला.
तर सोमवारी मोहाडी इथल्या विद्यार्थिनीनं, तर निवृत्तीनगरातील तरुणानं आत्महत्या, मंगळवारी दीक्षितवाडीतील आठवीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
'ती' अत्यवस्थ मंगळवारी दीक्षितवाडीतील विद्यार्थिनीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचं जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.