नवी मुंबईतील दिघ्यामधील त्या इमारती ताब्यात घ्या : उच्च न्यायालय

  नवी मुंबईमधील दिघातील अनधिकृत इमारतींमधल्या रहिवाशांची परवड सुरूच आहे. पावसातही इथल्या रहिवाशांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.

Updated: Jun 14, 2016, 08:34 PM IST
नवी मुंबईतील दिघ्यामधील त्या इमारती ताब्यात घ्या : उच्च न्यायालय title=

मुंबई :  नवी मुंबईमधील दिघातील अनधिकृत इमारतींमधल्या रहिवाशांची परवड सुरूच आहे. पावसातही इथल्या रहिवाशांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.

 

इमारतीतल्या रहिवाशांना बाहेर काढून अनधिकृत इमारती ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. कमलाकर आणि पांडुरंग या दोन इमारती पुढच्या २४ तासांत ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टानं एमआयडीसीला दिले आहेत. 

मात्र, पावसाळ्यात इमारतीवर कारवाई शक्य नसली तरी या इमारती ताब्यात घेता येतील, असे न्यायालयाने आजच्या निकालात म्हटले. पावसाळ्यात कारवाई करण्यास एमआयडीसीनं असमर्थता दर्शवली होती. त्यावर कोर्टानं हे आदेश दिलेले आहेत. त्यामुळं दिघातल्या या दोन इमारतींमधल्या रहिवाशांवर ऐ्न पावसाळ्यात रस्त्यावर येण्याची वेळ आलीय.