पनवेलमध्ये स्कूलबसमध्ये चिमुरडीची छेडछाड

येथील खांदा कॉलनी सेक्टर १३ मधल्या न्यू होरायझन स्कूलमधल्या एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीची बसमध्ये छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Updated: Dec 16, 2015, 10:00 AM IST
पनवेलमध्ये स्कूलबसमध्ये चिमुरडीची छेडछाड title=

पनवेल : येथील खांदा कॉलनी सेक्टर १३ मधल्या न्यू होरायझन स्कूलमधल्या एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीची बसमध्ये छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याप्रकरणी स्कूल बसच्या क्लिनरला अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय.

तसंच पालक वर्गात घबराट निर्माण झालीय. क्लीनर दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे शाळा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.