बीड : गुरुजनांमुळे देशाची भावी पिढी घडते असं म्हणतात. पण तेच गुरुजन विद्यार्थ्याच्या मुळावर उठले, तर बीडकर सध्या याचाच प्रत्यय येत आहे. प्राचार्य, मुख्याध्यापक पदावर असणाऱ्या महादेव बजगुडे, पवार आणि केशव भांगे नावाच्या तिघांनी आदिवासी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
महाविद्यालयात प्रवेश देतो, म्हणून तिचा लैंगिक छळ केला गेला आहे. २० ते २२ शिक्षक, साथीदार यात सहभागी होते. हे प्रकरण चव्हाट्यावर येणार, हे लक्षात येताच पीडित मुलीवर खंडणीचा गुन्हाही दाखल करत तिला अटकही करण्यात आली. परंतु तिची मेडीकल चाचणी झाल्यानंतर, ती ३ महिन्यांची गर्भवती असल्याचं सत्य समोर आलं.
हे सत्य बाहेर आल्यानंतरही पोलिसांनी तब्बल आठ दिवसांनी मुलीची फिर्याद नोंदवून घेतली. प्राचार्य, मुख्याध्यापक आणि सहशिक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय.
आपल्या मुलीला अटक केल्यानंतर काहीही कळवण्याचं औदार्यही बीडच्या पोलिसांनी दाखवलं नाही. उलट मुलीचं लग्न झालं आहे, तिच्या नवऱ्यापासूनच ती गरोदर असल्याचं पोलिसांनी भासवल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
ही घटना बीडच्या सामाजिक कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी पीडित मुलीची सुटका केली. यासंदर्भात पोलिसांना विचारलं असता त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली. तर बीडमधील सेक्स रॅकेटचे पडसाद विधान परिषदेतही उमटले.
प्राचार्यांनी केलेल्या या कुकर्मामुळे शिक्षण क्षेत्रात एकाच खळबळ उडालीय. राष्ट्रीय खेळाडू असलेल्या आदिवासी मुलीच्या तक्रारीनुसार हे मोठं सेक्स रॅकेट असण्याची दाट शक्यताय. त्यामुळे आरोपींची नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी होतेय.