पुणे : शिक्षक संघटनांनी १३ जानेवारी रोजी राज्यात शाळा बंद करण्याचा इशारा दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करुनही मागण्या मान्य होत नसल्यानं, शाळा बंद, आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे . सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यातल्या १८ संघटना पहिल्यांदाच या मुद्द्यावर एक दिसून येत आहेत.
राज्यातील अनुदानित, विनाअनुदानितच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालये १३ जानेवरी रोजी शाळा बंद आंदोलनात सामिल आहेत. आपल्या मागण्यांसाठी या संघटनांनी सरकारविरोधात एकत्रितपणे दंड थोपटले असल्याचं दिसतंय.
मुंबईसह राज्यातील प्रत्येक तालुका आणि जिल्हास्तरावर शिक्षक संघटनांकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. त्यामुळं उद्या राज्यभरात विद्यार्थ्यांनी अघोषित सुटी मिळण्याची शक्यता आहे. आता शासन शिक्षकांच्या मागण्यांवर काय विचार करणार, शिक्षकांच्या पदरी पुन्हा निराशा पडणार का हे उद्या समजणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.