ठाणे महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेची सरशी

महापालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष आणि शिवसेनेची सरशी झालीय. वॉर्ड नंबर 32 अ साठी झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या स्वाती देशमुख यांनी शिवसेनेच्या उमेदवार संगीता घाग यांच्यावर 194 मतांनी विजय मिळवला. 

Updated: Aug 29, 2016, 10:50 PM IST
ठाणे महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेची सरशी title=

ठाणे : महापालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष आणि शिवसेनेची सरशी झालीय. वॉर्ड नंबर 32 अ साठी झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या स्वाती देशमुख यांनी शिवसेनेच्या उमेदवार संगीता घाग यांच्यावर 194 मतांनी विजय मिळवला. 

या वॉर्डात भाजप उमेदवार संजय बोडके यांना केवळ 878 मतं मिळाली. तर वॉर्ड नंबर 53 अ मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत शिवसेनेनं आपली जागा कायम राखली आहे. 

शिवसेनेच्या पूजा करसुळे यांनी भाजपच्या कल्पना गायकवाड यांचा 1 हजार 885 मतांनी दणदणीत पराभव केला. ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपची युती असली तरी दोघांमध्येच या पोटनिवडणुकीत चूरस पाहायला मिळाली.  

आता येणाऱ्या २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजाप एकत्र येणार की पुन्हा असाच रंगतदार सामना पाहायला मिळणार याचीच उत्सुकता लागलीय.