ठाणे, पालघर स्थानिक स्वराज्य विधान परिषद जागेसाठी ३ जूनला मतदान

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या जागेसाठी ३ जूनला मतदान होतंय. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचा कार्यकाळ ८ तारखेला संपतोय.

Updated: May 7, 2016, 03:47 PM IST
ठाणे, पालघर स्थानिक स्वराज्य विधान परिषद जागेसाठी ३ जूनला मतदान  title=

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या जागेसाठी ३ जूनला मतदान होतंय. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचा कार्यकाळ ८ तारखेला संपतोय.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार वेळा याच मतदारसंघातून निवडून गेलेल्या डावखरेंनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर आणि मीरा-भाईंदर या महापालिका, अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिका तसंच मुरबाड आणि शहापूर नगर पंचायतीचे ८०८ सदस्य यात मतदान करतील.

तसंच पालघर जिल्ह्यातल्या वसई-विरार महापालिका, पालघर जिल्हा परिषद, डहाणू, जव्हार आणि पालघर नगरपंचायतीचे २५२ सदस्यही मतदानाचा हक्क बजावतील. अर्ज दाखल करण्याची मुदत  १७ मे आहे. मतमोजणी ६ जून रोजी होणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर निवडणूक अधिकारी असतील. या कालावधीत दोन्ही जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू असेल.