पुणे : आरटीओ भ्रष्टाचारमुक्त करण्याचा निर्धार केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय.
आरटीओ कारभार ऑनलाईन होणार असल्यानं आता एजंटांनी इतर व्यवसाय पाहावा, असा सल्लाही गडकरींनी दिलाय.
यासाठी देशातल्या चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याची माहिती गडकरींनी पुण्यात दिलीय. त्यामुळं ट्रॅफिक पोलिसांची गरज भासणार नाही, असंही गडकरींनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजेच, काही दिवसांपूर्वी गडकरी स्वत:च नागपूरच्या रस्त्यांवर हेल्मेटशिवाय स्कूटर चालवताना कॅमेऱ्यासमोर दिसले होते...
सर्व एजंटना हद्दपार करण्याचा फर्मान सोडणाऱ्या परिवहन आयुक्त महेश झगडे यांचं गडकरींनी यावेळी कौतुक केलंय. झगडे चांगलं काम करत असल्याचं सर्टिफिकेटच गडकरींनी मीडियासमोर दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.