रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या मुजोरीला चाप, आरटीओचा व्हॉ़ट्सअॅपनंबर

ठाणे आरटीओ अंतर्गत आलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप लावण्याचा आणि नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ठाणे आरटीओ आणि पोलीस आयुक्तालयाने व्हॉट्सअॅप नंबर सुरू केला आहे. 

Updated: Oct 19, 2015, 09:46 AM IST
रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या मुजोरीला चाप, आरटीओचा व्हॉ़ट्सअॅपनंबर  title=

डोंबिवली : ठाणे आरटीओ अंतर्गत आलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप लावण्याचा आणि नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ठाणे आरटीओ आणि पोलीस आयुक्तालयाने व्हॉट्सअॅप नंबर सुरू केला आहे. 

९७६९६४४५६३ असा हा क्रमांक आहे. या क्रमांकावर नागरिकांना रिक्षा किंवा टॅक्सी चालकांविरोधात काही तक्रार असेल संपर्क साधण्यास सांगितले आहे. तसेच त्या रिक्षा किंवा टॅक्सीचा फोटोही टाकण्याचे आवाहन शहर वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. 

जास्त भाडे आकारणे, भाडे नाकारणे, ग्राहकांशी विनाकारण वाद घालणे, मुजोरी करणे अशा प्रकरणात नागरिकांना कोणी वाली नसतो. त्यावर उपाय म्हणून डोंबिवलीत वाहतूक विभागाकडून ठिकठिकाणी फलक लावले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.