राज्यातील शिक्षण व्यवस्थेचे वाजले बारा, शिक्षण मंत्र्यांनी वाचला पाढा

राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेचं भयाण वास्तव दस्तुरखुद्द शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत मांडले. राज्यातील शिक्षणाच्या दुरावस्थेचा शिक्षणमंत्र्यांनी विधानसभेत पाढाच वाचला.

Updated: Dec 10, 2015, 11:45 PM IST
राज्यातील शिक्षण व्यवस्थेचे वाजले बारा, शिक्षण मंत्र्यांनी वाचला पाढा title=

नागपूर : राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेचं भयाण वास्तव दस्तुरखुद्द शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत मांडले. राज्यातील शिक्षणाच्या दुरावस्थेचा शिक्षणमंत्र्यांनी विधानसभेत पाढाच वाचला.

राज्यात ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांची संख्या १२ हजार ४४६ शाळा असल्याचं त्यांनी सांगितलं. या शाळांमध्ये विद्यार्थ्यी कमी असूनही तब्बल २४ हजार शिक्षक आहेत. तर १० शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिक्षण घेत नसल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

या शाळा बंद करून विद्यार्थ्यांना वाहतुकीची व्यवस्था करून चांगल्या शाळेत पाठवण्याचा सरकारचा विचार असल्याचं तावडेंनी नमूद केलंय. तसंच शिक्षक आणि विद्यार्थी समायोजनाचा शासनानं निर्णय घेतलाय. मात्र कोर्टाची याला स्थगिती आहे. त्यामुळं
सर्वांनी राजकारणापलिकडे शिक्षणाचा विचार करण्याचे आवाहन यावेळी  शिक्षणमंत्र्यांनी केलं. 

भयाण वास्तव
- राज्यात ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांची संख्या १२४४६
- विद्यार्थ्यी कमी असूनही या शाळांवर २४ हजार शिक्षक
- शून्य विद्यार्थी असलेल्या राज्यात १० शाळा
- एक विद्यार्थी असलेल्या राज्यात ७५ शाळा
- दोन विद्यार्थी असलेल्या राज्यात १० शाळा
- ३ विद्यार्थी असलेल्या राज्यात २५३ शाळा
- पाच विद्यार्थी असलेल्या राज्यात ३९२ शाळा
- सात विद्यार्थी असलेल्या राज्यात ५४२ शाळा
- आठ विद्यार्थी असलेल्या राज्यात ५६१ शाळा
- नऊ विद्यार्थी असलेल्या राज्यात ५८० शाळा
- दहा विद्यार्थी असलेल्या राज्यात १० शाळा
- ११ विद्यार्थी असलेल्या राज्यात १००३ शाळा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.