कुटुंबात रडायलाही कुणी राहिलेलं नाही

पासून 60 किलोमीटरवर असलेल्या मालीण गावावर डोंगराचा मोठा भाग कोसळलाय. डिंभे धरणाच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या आदिवासी महादेव कोळी समाजाचं हे माळीण गाव आहे. हा डोंगर त्यांना त्यांच्या घरादारातला वाटायचा.

Updated: Jul 31, 2014, 05:42 PM IST
कुटुंबात रडायलाही कुणी राहिलेलं नाही title=

पुणे : पासून 60 किलोमीटरवर असलेल्या मालीण गावावर डोंगराचा मोठा भाग कोसळलाय. डिंभे धरणाच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या आदिवासी महादेव कोळी समाजाचं हे माळीण गाव आहे. हा डोंगर त्यांना त्यांच्या घरादारातला वाटायचा.

माळीण गाव डोंगराने गिळंकृत केलं, माळीण गाव पाच किलोमीटरवर असेल. याआधीच तुम्हाला जाण्यासाठी थांबवलं जातं, सर्वबाजूला अॅम्ब्युलन्स आणि जेसीबी मशीन्स दिसतीय, यादरम्यान कधी रिमझिम तर कधी जोरदार पावसाचा तुम्हाला सामना करावा लागेल.

वाहतूक थांबवण्यात येण्याचं कारण जेसीबी आणि अॅम्ब्युलन्सना येण्याजाण्यासाठी जागा गरजेची आहे. घटनास्थळी पोहोचल्यावर मोबाईल नेटवर्क देखिल गायब, सर्व बाजूला चिखल पसरला होता.

35 फूट उंच कळसाचं मंदिरही ढिगाऱ्याखाली
या ढिगाऱ्याखाली अख्ख 35 फूट उंचीचं कळसासह मंदिरही गाडलं गेलं आहे. यावरून याचा व्यवस्थित अंदाज घेता येईल की, ढिगारा किती उंच आहे. चारही बाजूला ढिगारा पसरला आहे

डोंगरावरून अजूनही पाणी वाहत येतंय, याला वाट करून देण्याचं काम जेसीबी करतायत, कारण मदत कार्यात अडथळे येत आहेत. एनडीआरएफचे जवान मोठ्या हिंमतीने ढिगाऱ्यात उतरून वर चढून मदत करतांना दिसत आहेत. 

चार जेसीबी मशीन सुरूवातीला गाळ काढत होते, यातून तुटलेल्या घरांची छप्परं दिसत होती. बुधवारी सकाळी या ठिकाणी फक्त 2 जेसीबी पोहोचले होते.

रडायलाही कुणी राहिलेलं नाही
अनेक परिवार मातीत दबले गेले आहेत. यामुळे काही घरात आपले गेले म्हणून रडण्यासाठीही कुणी नाहीय, गावातील वाचलेले व्यक्तीही यावर बोलायला तयार नाहीयत.
 
पोस्टमार्टम, आणि सामूहिक अंत्यसंस्कार
मंचरच्या सरकारी रूग्णालयात नर्स मृतदेहांची आणि जखमींची वाट पाहात असले तरी, आता जखमी कुणीही येतांना दिसत नव्हतं, मृतदेह ही येत नव्हते, कारण या मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अंत्यसंस्काराआधी त्याच ठिकाणी मृतदेहांचं पोस्टमार्टम केलं जातंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.