अकोला : नवरात्रीचा शेवट वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करून करण्यात येतो. दसरा साजरा करताना सर्वत्र रावणाचं दहन करण्याची प्रथा आहे. अकोला जिल्ह्यातल्या सांगोळ्यात मात्र रावणाची पूजा केली जाते. पाहूयात या गावची अनोखी कथा.
अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातल्या सांगोळाचं वेगळेपण ऐकून तुम्हीलाही आश्चर्य वाटेल. साऱ्या देशात रावणाचं दहन होत असताना दरवर्षी दसऱ्याला या गावात रावणाची पूजा केली जाते. गावात दगडात कोरलेली रावणाच्या मूर्ती आहे. 10 तोंडं, 20 हात असलेल्या प्रतिमेची दरवर्षी पूजा केली जाते. रामायणात मुख्य खलनायक या गावात देव कसा हा प्रश्न आम्ही गावकऱ्यांना विचारला.
गावात रावणाच्या मंदिरासोबत श्रीराम, हनुमान, देवीचीही मंदिरं आहेत. श्री राम,हनुमान,देवीचंही मंदिर आहे. पण रावणाच्या मंदिरामागची कथाही मोठी रोचक आहे.
रावणाच्या यामूर्तीला काही वर्षांपूर्वी चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र गावकऱ्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला होता. मूर्तीची येथील पुजारी दररोज पूजा करतात. गावची रावणावर जशी श्रद्धा आहे, तशा काही अंधश्रद्धा आहेत.
रावणाच्या कृपेनंच आपल्या गावात लक्ष्मी नांदते अशी गावक-यांची श्रद्धा आहे.
रावणातले सद्गुण शोधून त्याची पूजा करणा-या पातूरच्या गावकऱ्यानी विजया दशमीची खरी परंपरा जपलीय, असंच यानिमित्तानं म्हणायला हवं.