पुण्यात ३ मुलींची कॅनॉलमध्ये उडी घेऊन आत्महत्या

पुण्यामध्ये 3 अल्पवयीन मुलींनी कॅनॉलमध्ये उडी घेउन आत्महत्या केली आहे. काल संध्याकाळपासून त्या घरातून बेपत्ता होत्या. एकाच भागात राहणा-या या तिघींचे मृतदेह आज कॅनॉलमध्ये सापडले. 

Updated: Sep 30, 2016, 08:42 PM IST
 पुण्यात ३ मुलींची कॅनॉलमध्ये उडी घेऊन आत्महत्या  title=

पुणे : पुण्यामध्ये 3 अल्पवयीन मुलींनी कॅनॉलमध्ये उडी घेउन आत्महत्या केली आहे. काल संध्याकाळपासून त्या घरातून बेपत्ता होत्या. एकाच भागात राहणा-या या तिघींचे मृतदेह आज कॅनॉलमध्ये सापडले. 

मुस्कान मुलतानी, वय 11, इयत्ता 9 वी, आबेदा शेख, वय 13, दहावी,  श्रुती वाघमारे वय 15, 11 वी , असे मृत मुलींची नावे असून  त्या  तिघीही कासेवाडी परिसरात राहणा-या आहेत. 

काल संध्याकाळी 6 वाजता घरातून बेपत्ता झाल्या होत्या. आज त्यांचे मृतहेद कॅनॉल सापडले. एकाच परिसरात राहात होत्या. तिघीही जवळच्या मैत्रिणी आहेत. खडक पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार मध्यरात्री दीडवाजता दाखल केली होती.