ट्रॉलीवर भरधाव स्वीफ्ट आदळून 3 ठार

एकजण गंभीर जखमी झाला. मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 27, 2016, 06:45 PM IST
ट्रॉलीवर भरधाव स्वीफ्ट आदळून 3 ठार title=

सांगली : मिरज-कोल्हापूर रस्त्यावर धामणी फाट्याजवळ थांबलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर भरधाव स्वीफ्ट मोटार आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले.

तर एकजण गंभीर जखमी झाला. मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे. 

मोटार चालक दीपक संजय जाधव, नंदकुमार चव्हाण आणि  उदय पाटील अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर उदय कांबळे हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.