मुर्तिजापूरमध्ये भीषण अपघात, सात ठार , १ जखमी

अकोला इथल्या राष्ट्रीय महामार्गावर मुर्तिजापूरजवळ मारुती व्हॅननं ट्रकला धडक दिल्यानं सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. मृत प्रवासी अकोल्यातील रहिवासी असून हे सर्व जण पासपोर्ट आणण्यासाठी नागपूरला जात होते.

Updated: Dec 1, 2014, 11:08 AM IST
मुर्तिजापूरमध्ये भीषण अपघात,  सात ठार , १ जखमी title=

मुर्तिजापूर: अकोला इथल्या राष्ट्रीय महामार्गावर मुर्तिजापूरजवळ मारुती व्हॅननं ट्रकला धडक दिल्यानं सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. मृत प्रवासी अकोल्यातील रहिवासी असून हे सर्व जण पासपोर्ट आणण्यासाठी नागपूरला जात होते.

मुर्तिजापूरजवळील कुरुम आणि माना दरम्यान नवसारजवळ सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास मारुती व्हॅनने ट्रकला धडक दिली. ही धडक ऐवढी भीषण होती की मारुती व्हॅन सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

मृतांमध्ये एक महिला व तीन लहान मुलांचा समावेश आहे. अपघातात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर अमरावतीमध्ये रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.