पुणे : जिल्ह्यातील समाजकंटकावर वचक बसवण्याबरोबरच लहान मुलं, महिला तसेच आर्थिक सामाजिक दुर्बल घटकांना सुरक्षा पुरवण्यावर आगामी काळात भर देणार असल्याचं पुण्याचे नवनियुक्त पोलीस अधिक्षक मोहम्मद सुवेज हक यांनी म्हटलंय.
याआधी गडचिरोली तसेच रायगडमध्ये काम केलेले सुवेज हक हे एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी नुकताच पुण्याचा पदभार स्वीकारला.
पुण्याच्या ग्रामीण भागातील वाढती गुन्हेगारी खास करून लॅंड आणि वाळू माफीयाचा बंदोबस्त करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.