बारामती: गावात कायमची दारूबंदी व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका महिला सामाजिक कार्यकर्त्याला दारूविक्रेत्या महिलेनं आणि तिच्या मुलानं विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना प्रजासत्ताक दिनी घडली. बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक गावात हा लाजीरवाणा प्रकार घडला.
बारामती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव बुद्रुक या गावात अनेक बेकायदेशीर दारुधंदे सुरु आहेत. इथली अनेक कुटुंबं दारुपायी देशोधडीला लागली आहेत. त्यामुळं इथल्या सामाजिक कार्यकर्त्या कल्पना माने यांनी गावात दारुबंदीसाठी पुढाकार घेतला होता.
आज त्या प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी जात असताना इथल्या एका दारु विक्री करणाऱ्या महिलेनं आणि तिच्या मुलानं माने यांची दुचाकी अडवून त्याना विवस्त्र करुन मारहाण केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.