तुकाराम मुंढे यांच्या 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमाला चांगला प्रतिसाद

वादग्रस्त ठरलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुन्हा वॉक विथ कमिश्नर उपक्रम नव्या जोमानं पुन्हा सुरु केलाय. नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Updated: Nov 5, 2016, 06:55 PM IST
तुकाराम मुंढे यांच्या 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमाला चांगला प्रतिसाद title=
संग्रहित छाया

नवी मुंबई : वादग्रस्त ठरलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुन्हा वॉक विथ कमिश्नर उपक्रम नव्या जोमानं पुन्हा सुरु केलाय. नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नवी मुंबई मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरच्या अविश्वास प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी सध्या स्थगिती दिली आहे. यामुळे मुंढेंनी सुरू केलेला वॉक विथ कमिश्नर उपक्रम नव्या जोमानं पुन्हा सुरू झाला. हा उपक्रम आज नेरुळमध्ये घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी निवेदन देण्यासाठी गर्दी केली. 

नेरुळ विभागातल्या समस्यांवर त्वरित कारवाईचे आश्वासन यावेळी मुंढेंनी दिले. दरम्यान आपले काम शासनाच्या नियमात राहून लोकांसाठी कायम सुरू राहिल, असे यावेळी मुंढे म्हणाले.