मिरजेत दोन बेवारस मृतदेहांची विटंबना

सांगली जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य विभागानं मिरज शहरात दोन बेवारस मृतदेहांची विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार उघड झालाय. 

Updated: Nov 1, 2014, 10:25 PM IST
मिरजेत दोन बेवारस मृतदेहांची विटंबना title=

सांगली : सांगली जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य विभागानं मिरज शहरात दोन बेवारस मृतदेहांची विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार उघड झालाय. 

पोस्ट मार्टम केलेले दोन बेवारस मृतदेह नग्नावस्थेत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे दफन करण्यासाठी देण्यात आले. मात्र महापालिकेनं शववाहिका असूनही हे मृतदेह तशाच अवस्थेत कचरा गाडीतून नेले. एवढंच नव्हे तर या मृतदेहांना दफन करण्यापूर्वी त्यांची अवहेलना करण्यात आली. 

या मृतदेहांच्या पायाला दोरी बांधून त्यांना जमिनीवरून फरफटत नेण्यात आले. त्यानंतर या दोन्ही मृतदेहांना एकाच तीन फुटांच्या छोट्या खड्ड्यांत पुरण्यात आलं. याप्रकरणी चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.