राज ठाकरेंकडून पीडित दलित कुटुंबाचे सांत्वन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या जवखेडे  गावात जाऊन पीडित दलित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. राज ठाकरे यांनी पीडित कुटुंबाशी संवाद साधत त्यांचं म्हणणं ऐकून घेतल. तसंच एक लाखाची आर्थिक मदत जाहीर केली.

Updated: Nov 1, 2014, 08:49 PM IST
राज ठाकरेंकडून पीडित दलित कुटुंबाचे सांत्वन title=

जवखेडे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या जवखेडे  गावात जाऊन पीडित दलित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. राज ठाकरे यांनी पीडित कुटुंबाशी संवाद साधत त्यांचं म्हणणं ऐकून घेतल. तसंच एक लाखाची आर्थिक मदत जाहीर केली.

या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार  असल्याची  माहितीही राज ठाकरेंनी पीडित कुटुंबाला दिली. यापूर्वी या पीडियात कुटुंबाल अजित पवारांनी भेट दिली होती. त्यामुळं आता नवे मुख्यमंत्री जवखेड्याला भेट देणार का ? याबाबत सवाल उफस्थित होतोय.

जवखेडे गावात ऐन दिवाळीमध्ये एका दलित कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आलीय. मानवतेला काळिमा फासणा-या या हत्याकांडाचे सूत्रधार अजून मोकाटच फिरतायत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.