ठाणे : भिवंडीत आज पुन्हा एक दुमजली इमारत कोसळली आणि अनेकांच्या मनात धस्स झालं. या घटनेनंतर इतर अनेक रहिवासी चिंतातूर झालेत.
कारण, भिवंडीत आठ दिवसात इमारत कोसळल्याची ही दुसरी घटना आहे. ३१ जुलै २०१६ रोजीही भिवंडीतील गैबीनगरमध्ये कबिर अन्सारी नावाची इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत आठ जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर चोवीस जण जखमी झाले होते.
उल्लेखनीय म्हणजे, ही इमारतदेखील धोकादायक म्हणून घोषीत करण्यात आली होती. मात्र, तरिही इथं आठ ते दहा कुटुंबं रहात होती. आज कोसळलेली महादेव गुप्ता ही इमारत देखील प्रशासनानं धोकादायक म्हणून घोषित केली होती.
भिवंडीत अजूनही अशा १७ अतिधोकादायक इमारती आहेत. त्यामुळे आता यापुढे पुन्हा अशी दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनानं लवकरात लवकर या इमारती रिकाम्या करुन जमिनदोस्त करणं गरजेचं आहे.