महाड दुर्घटनेनंतर ही पोस्ट होतेय व्हायरल

महाडमध्ये पूल वाहून गेल्याने २ एसटी आणि काही गाड्या वाहून देल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत. सध्या एक मॅसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होते आहे. पाहा काय आहे ही पोस्ट.

Updated: Aug 7, 2016, 10:06 AM IST
महाड दुर्घटनेनंतर ही पोस्ट होतेय व्हायरल title=

मुंबई : महाडमध्ये पूल वाहून गेल्याने २ एसटी आणि काही गाड्या वाहून देल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत. सध्या एक मॅसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होते आहे. पाहा काय आहे ही पोस्ट.

पावसाचे थैमान अनेक पूल वाहून रस्ते वाहून गेले अनेक निरपराधी जीव वाहून गेले. अशा जेव्हा बातम्या वाचतो तेव्हा खूप वाईट वाटतं. मग इंग्रजांना मानाने परत बोलावून म्हणावे कि रस्ते आणि पूल तुम्हीच बनवा हि आमच्या बसची बात नाही.

- दोष सावित्री नदीचा नाही आणि दोष त्या पुलाचाही नाही.

- दोष आहे तो भ्रष्ट राजकारणी लोकांचा

- ऑफिसमध्ये बसून पगार घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील लोकांचा.

- सावित्रीचं शरीर पोखरून काढणार्या वाळू-दगड माफियांचा आहे.

- तहसीलदार, जिल्हाधिकारी, सचिवांचा

- वाळू उपसाला झटपट स्थानिक परवानगी देण्याची तरतूद करणाऱ्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा आहे ?

मे महिन्यातच पाहणी करून पूल उत्तम आहे असं प्रमाणपत्र देणाऱ्या रस्ते विकास महामंडळाचा आहे ? 

- आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेचा आहे.

- वेळोवेळी नद्यांना, माणसांना गृहीत धरणार्या व्यवस्थेचा आहे.

- नदीच्या पुरात पूल कोसळतो, दोन एसटी गाड्या वाहून जातात. गाड्या आणि माणसं तासनतास सापडत नाहीत आणि आपल्याला महासत्ता होण्याचं मधाचं बोट चाटवलं जातं. आपण ही या सगळ्या गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे.