उदयनराजे भोसलेंचा राष्ट्रवादीला इशारा, नेत्यांची धावपळ

सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद देण्याचं आश्वासन देऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं खासदार उदयनराजे भोसले यांचा राग शांत केला. कार्यकर्त्यांना डावलल्यास राजकीय गड नेस्तनाबूत करू असा इशारा उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीला दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा इशारा दिल्याने राष्ट्रवादीचे धावपळ उडाली.

Updated: Sep 20, 2014, 05:19 PM IST
उदयनराजे भोसलेंचा राष्ट्रवादीला इशारा, नेत्यांची धावपळ title=

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद देण्याचं आश्वासन देऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं खासदार उदयनराजे भोसले यांचा राग शांत केला. कार्यकर्त्यांना डावलल्यास राजकीय गड नेस्तनाबूत करू असा इशारा उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीला दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा इशारा दिल्याने राष्ट्रवादीचे धावपळ उडाली.

अखेर राष्ट्रवादी भवनात पालकमंत्री शशिकांत शिंदे, नामदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत उदयनराजे भोसले गटाला पद देण्याचा निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली.

अखेर उदनराजे भोसले यांच्या गटाला उपाध्यक्ष पद देण्याचं राष्ट्रावादीने आश्वासन दिलंय. राष्ट्रवादीनं दिलेला शब्द पाळावा, अशी अपेक्षा उदयनराजे भोसलेंनी व्यक्त केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.