'तर मी मंत्री झालो असतो'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलं. 

Updated: Sep 2, 2016, 09:01 PM IST
'तर मी मंत्री झालो असतो' title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलं. गृहनिर्माण धोरण राबवताना मुंबई महापालिकेलाही विचारात घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. 

या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या जागांची नाव बदलणाऱ्या बिल्डरांना उद्धव ठाकरेंनी यावेळी दम भरला. शाकाहर आणि मांसहार असा कोणताही भेदभाव चालणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी बिल्डरांना सुनावलं. मला सर्वसामान्यांची भाषा कळते, किचकट नियम कळत असते तर मंत्री झालो असतो, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.